पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 3) दिवसभरात 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 615 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 410 जण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 308, पेण 90, अलिबाग 56, माणगाव 32, खालापूर 31, कर्जत 24, रोहा 21, उरण 14, महाड 13, सुधागड नऊ, श्रीवर्धन आठ, पोलादपूर सात, तर मुरूडमधील दोघांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात सहा, उरण पाच, अलिबाग दोन, कर्जत, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा येथे प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 29,317 व मृतांची संख्या 856 झाली आहे. जिल्ह्यात 24,339 जण कोरोनामुक्त झाल्याने 4122 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
राम तेरी गंगा मैली @४१ वर्षे; राज कपूरच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट
चित्रपटाच्या नावात त्याचं व्यक्तिमत्त्व अथवा ओळख व्हायला हवी. त्यातही दिग्दर्शक दिसतो. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे …
RamPrahar – The Panvel Daily Paper