Breaking News

नागोठणे टपाल कार्यालयातील यंत्रणा आता सुरळीत; भाजपचा दणका

नागोठणे ः प्रतिनिधी 

येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली होती. याबाबत नागोठणे शहर भाजपने याची दखल घेत शहर अध्यक्ष सचिन मोदी यांच्या नेतृत्वाखाली टपाल कार्यालयास  9 सप्टेंबर रोजी दुपारी निवेदन देण्यात आले होते. या पत्राची तातडीने दखल घेण्यात आली असून कार्यालयातील सर्व्हरची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच यंत्रणा सुरळीत नसल्याने झालेल्या त्रासाबद्दल जिल्ह्याचे मुख्य तसेच नागोठणे टपाल कार्यालयाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचे सचिन मोदी यांनी सांगितले. याबाबत येथील टपाल कार्यालयाचे उप डाकपाल नरेश पाटील यांना विचारले असता नागोठण्याच्या बीएसएनएल कंपनीकडून सर्व तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली असून, सर्व्हरचीदेखील दुरुस्ती झाल्याने टपाल खात्याकडून ग्राहकांना पुरविण्यात येणार्‍या सर्व महत्त्वाच्या सेवा पूर्ववत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply