Breaking News

भाजप कामोठे मंडळतर्फे स्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कामोठे मंडळ युवा मोर्चा तर्फे मायक्का मंदिर से-35 व शिवम कॉम्प्लेक्स समोरचे मैदान जेसीबी डंपरच्या साहाय्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर युवकांमध्ये स्वच्छतेप्रति जनजागृती निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी प्रतिकात्मक सफाई अभियान राबवले.

या कार्यक्रमास प्रामुख्याने भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष तसेच उत्तर रायगड युवा मोर्चा प्रभारी अजित सिंग जी उपस्थित होते. तसेच उत्तर रायगड युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, अमर ठाकूर, महेश पाटील, जमीर शेख, आशिष कडू, परेश बोरसे, भूषण जाळे, परेश पाटील, चिन्मय समेळ, अक्षय राणे, कामोठे मंडळ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, नवनाथ भोसले, तेजस जाधव, मयंक कुमार, धीरज सिंग,

अमित सावंत, आदित्य भगत,  सुरेंद्र हळ्ळीकर, किरण जाधव, मानेश्वर मुळे, कळंबोली मंडळ अध्यक्ष गोविंद झा, गौरव नाईक पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, गौरव कांडपिळे, अभिषेक भोपी, प्रथमेश भगत, अथर्व गुजरे, आकाश बैड द, विशाल झुमरे, पनवेल ग्रामीण मंडळ अध्यक्ष आनंद ढवळे, विश्वजित पाटील, कर्जत मंडळ अध्यक्ष प्रमोद पाटील, राहुल भदे, खोपोली मंडळ अध्यक्ष अजय इंगुळकर या सर्व पदाधिकारी मंडळींच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान व मंडळ बैठक पार पडली.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply