पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात तब्बल 30 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 210 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 5) झाली, तर दिवसभरात 437 रुग्ण बरे झाले आहेत.
मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 20 व ग्रामीण 1) तालुक्यातील 21, अलिबाग चार आणि उरण, कर्जत, पेण, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (मनपा 121, ग्रामीण 33) तालुक्यात 154, अलिबाग 17, पेण 14, खालापूर नऊ, मुरूड व रोहा प्रत्येकी पाच, उरण तीन आणि कर्जत, माणगाव व श्रीवर्धन प्रत्येकी एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 48 हजार 556 आणि मृतांची संख्या 1373 झाली आहे. जिल्ह्यात 43 हजार 505 जण कोरोनामुक्त झाल्याने 3678 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
Check Also
उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी
आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …
RamPrahar – The Panvel Daily Paper