Breaking News

इंडोनेशियन तरुणीचा पोलिसांना चकवा

बेपत्ता झाल्याचा केला बनाव

पाली ः प्रतिनिधी

इंडोनेशियावरून आलेली क्रिस्ती नावाची तरुणी चक्क सुधागड तालुक्यातील पडघवली येथून रविवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार पाली पोलीस स्थानकात आली. ही तरुणी पुण्याला आपल्या मित्राला भेटायला निघाली होती. सुधागड तालुक्यातील व जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांनी तरुणीचा कसून शोध घेतला, मात्र या तरुणीने तंत्रज्ञानाच्या साह्याने पोलीस व तिच्या मित्राला चांगलाच गुंगारा दिला आणि अखेरीस ती इंडोनेशियातच असल्याचे पोलिसांनी शोधून काढले.

याबाबत तरुणीचा मित्र सुरजप्रकाश विनोदकुमार दिवेली (28) याने क्रिस्ती हरवल्याची खबर मंगळवारी (दि. 20) दुपारी पाली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार क्रिस्ती अजलेना दशेरा (27, रा. इंडोनेशिया) ही उबेर टॅक्सीने पुण्याकडे निघाली होती. उबेर टॅक्सीवाल्याने आपण मगरपट्टा पुणे येथे पोहचलो आहोत असे सांगून क्रिस्तीला सुधागड तालुक्यातील पडघवली येथे सोडून तो निघून गेला, मात्र त्यानंतर क्रिस्ती कोणालाही दिसली नाही, असे आपल्या फिर्यादीत सुरजप्रकाशने सांगितले. पोलिसांनी क्रिस्तीचा संपूर्ण परिसरात शोध घेतला मात्र ती सापडली नाही.

या संदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याशी संपर्क साधला असता ती कथित बेपत्ता तरुणी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारीत नमूद इंडोनेशियातील कथित बेपत्ता तरुणीच्या मोबाइल लोकेशनच्या साह्याने आम्ही कसून शोध घेतला. मोबाइल संदेशाद्वारे तिच्याशी संपर्क साधला असता प्रारंभी सदर तरुणीने क्लिनिकमध्ये उपचार घेत असल्याचे सांगितले. त्या दृष्टीने पोलिसांनी शोध घेतला, मात्र नंतर तिच्या ऑफिसमध्ये संपर्क साधला असता ती तरुणी इंडोनेशियामध्येच असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मुंबई एअरपोर्टवर चौकशी केल्यावर अशा नावाची कोणी व्यक्ती इंडोनेशियावरून भारतात आली नसल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली. दरम्यान, तिचा पुण्यातील मित्र व तक्रारदार तरुणाला क्रिस्ती चकवा देत होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply