Breaking News

रायगडात 123 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात नव्या 123 कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 1) झाली, तर दिवसभरात 124 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 17) तालुक्यातील 100, पेण सात, अलिबाग सहा, कर्जत, खालापूर, रोहा व महाड प्रत्येकी दोन आणि माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत झालेले रुग्ण पनवेल व अलिबाग तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 54,122 आणि मृतांची संख्या 1554 झाली आहे. आतापर्यंत 51,239 जण कोरोनामुक्त झाल्याने 1329 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply