Breaking News

उरणच्या आदिवासी बांधवांना सहकार्य

उरण : वार्ताहर

आदिवासी कातकरी समाज हा नेहमीच शासकीय योजनांपासून वंचित राहिला आहे. म्हणूनच शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयानुसार आदिवासी समाजातील कातकरी आणि माडी या गोंड ह्या अनुसूचित प्रवर्गातील जाती प्रामुख्याने विकसित होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेले वर्षभर उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी बहुतांश वाड्यांवर कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत सतत पाठपुरावा केल्यामुळे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन कार्ड वाटप, दाखले वाटप टप्प्याटप्प्याने करण्यात येईल असे ठरले आहे. रेशन कार्ड बनवण्यासाठी धान्य पुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी नायब तहसीलदार पेडवी यांनी सुरुवात केली. त्यांच्या पुरवठा विभागातील अधिकारी गोरेगावकर मॅडम, बिरासदर, ललिता म्हात्रे, विलास पाटील यांनी नवीन रेशन कार्ड तयार करून जवळजवळ 50 टक्के वाड्यांवरील रेशन कार्ड नायब तहसीलदार मालती घरत यांच्या हस्ते वाटप केले. राहिलेल्या वाड्यांवरील रेशन कार्ड लवकरच बनवून मिळतील. त्याची सर्व प्रक्रिया सुरू आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply