मुंबई : महाराष्ट्र मच्छिमार संघनेचे अध्यक्ष आणि मच्छिमारांचे लढवय्य नेते दामोदर तांडेल यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू असताना आज त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले.
दामोदर तांडेल ह्यांनी गेली अनेक वर्ष मच्छिमार कोळी समजाच्या न्याया हक्कासाठी अनेक लढे दिले. मच्छिमारांना आपला व्यवसाय करताना कोणत्याही अडचणी येवू नये यासाठी ते नेहमी दक्ष असत. मच्छिमारांप्रमाणे अलिकडे ते ओबीसी संघटनेचे सुध्दा कार्य करू लागले होते. ओबीसी समाजालाही न्याय मिळावा त्यासाठी अलिकडे झालेल्या ओबीसांच्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने एक कुशल संघटक आणि लढवया नेता हरपला आहे, अशी प्रतिक्रीया ओबीसी व्हीजेएनटी जन मोर्चाचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांनी दिली.
दामोदर तांडेल यांनी मच्छिमार कोळी समाजाची गेली अनेक वर्ष उत्तम प्रकारे बांधणी केली होती. त्यांनी आता ओबीसी समाजाच्या संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष दिले असतानाच ते जावेत, याचे फार दुःख होते. कोळी आणि ओबीसी समाजाविषयी त्यांना आत्मियता असल्याने त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी सबंध आयुष्य वेचले. एक लढवय्या सेनानी आपल्यातून निघून गेला आहे, अशी प्रतिक्रिया अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष शेतकरी नेते दशरथदादा पाटील आणि ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे उपाध्यक्ष जे. डी तांडेल यांनी दिली.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper