Breaking News

रायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.
रायगडमध्ये रिमझिम रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडत आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर अधूनमधून शिडकावा होत आहे.
सोमवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून, किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असल्याचे दिसून आले.
या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाबरोबरच वाल, पावटा, भुईमूग, तूर यासारख्या कडधान्य पिकांनाही बसतो आहे. 

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply