Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रात विकासकामांचा झंझावात

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल ः प्रतिनिधी
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे होऊन पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. विभागात सर्वत्र विकासकामांचा झंझावात सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील शहरांसह गावांचाही विकास केला जात आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील जुई गावातील तलाव सुशोभीकरण, ओवे कॅम्प येथील गल्ली क्रमांक 1, गल्ली क्रमांक 2, गल्ली क्रमांक 3 आणि गल्ली क्रमांक 4 रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ओवे येथील गल्ली क्रमांक 1, गल्ली क्रमांक 2 आणि गल्ली क्रमांक 3 रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पेठ येथील रस्ता काँक्रीटीकरण, हसनभाई मंजिलपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, ओवेपेठ मंदिराजवळील रस्ता काँक्रीटीकरण, भोईरपाडा-तळोजे मजकूर येथे भोईरपाडा तळोजे मजकूर ते स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रीटीकरण, घोट येथे मुख्य रस्ता ते अभिमन्यू पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, मुख्य रस्ता ते राजेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, मुख्य रस्ता ते नितेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, खिडूकपाडा येथील लक्ष्मीनारायण मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण, दत्त मंदिर लक्ष्मण ठाकूर यांच्या घरापर्यंत, लक्ष्मण ठाकूर यांच्या घरापासून अर्जुन ठाकूर यांच्या घरापर्यंत व गुरुनाथ ठाकूर यांच्या घरापासून कुमार गुजराती दुकानापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, त्याचबरोबर खिडूकपाडा गाव मुख्य कमान रस्ता काँक्रीटीकरण, तसेच मोठा खांदा येथील रस्ता दुरुस्ती करणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
       या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, बबन मुकादम, अमर पाटील, संतोष भोईर, पापा पटेल, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, महादेव मधे, मुकीद काझी, विकास घरत, गोपीनाथ भगत, नगरसेविका चंद्रकला शेळके, शीला भगत,  कामोठे मंडल अध्यक्ष रवी जोशी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सी. सी. भगत, समीर कदम, नंदकुमार म्हात्रे, शशिकांत शेळके, रमेश खडकर, भाऊ भगत, मानाजी पाटील, चंद्रकांत कडू, युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत, अल्पसंख्याक समाजाचे नेते मन्सूर पटेल, साजिद पटेल, गुलजार पटेल, सचिन वास्कर, मोतीराम जोशी, प्रकाश जोशी, निर्दोष केणी, मुनाफ पटेल, जगदिश घरत, नाना भगत, प्रल्हाद चिमणे, लक्ष्मण भातोसे, संतोष पाटील, महेश रेवणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. 

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply