Breaking News

पाली (पोटल) आणि अंबेवाडी गावात पाणपोई; परवीन इंडस्ट्रीजचा उपक्रम

कर्जत : बातमीदार

सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून काही कंपन्या  त्यांच्या सीएसआर फंडातून समाजहिताचे प्रकल्प उभारतात. परवीन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा प्रकाश मित्तल यांनी कर्जत तालुक्यातील पाली (पोटल) आणि अंबेवाड़ी गावासाठी आपल्या कंपनीचा सीएसआर फंड उपलब्ध करुन दिला आहे. त्यातून फ़िल्टर वॉटर प्लांट  (स्वच्छ पाणी) योजना राबवून या दोन्ही गावांत पाणपोई उभारल्या आहेत. त्यांचे नुकताच लोकार्पण करण्यात आले. कंपनीच्या नफ्याचा वाटा समाजकार्यावर खर्च केला तर खर्‍या अर्थाने मानसिक समाधान लाभते असे मत या वेळी प्रकाश मित्तल यांनी व्यक्त केले. या वेळी  बिना मित्तल, त्यांचे सहकारी आनंद मांजरेकर, राजेश्री मांजरेकर, मीरा मांजरेकर, राजेश पेंडणेकर तसेच विवेक देशमुख, शिवाजी कुंभार, विलास देशमुख, नामदेव कुंभार, विजय देशमुख, बालकृष्ण देशमुख, गोरखनाथ शिंदे, किशोर दळवी, संतोष ह. देशमुख, संतोष म.देशमुख, गणपत देशमुख, भालचंद्र देशमुख, ज्ञानेश्वर कुंभार, कैलास दळवी, नारायण शिंदे, समीर दळवी, सुनील कुंभार, तानाजी देशमुख, उल्हास देशमुख, ऋतिक देशमुख, अजय देशमुख, नारायण पवार, रत्नप्रभा शिंदे, विमल देशमुख, कांचन दळवी, उर्मिला दळवी आदी पाली (पोटल) ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे संपूर्ण पाली(पोटल) व अंबेवाड़ी गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply