Breaking News

मुंबई वगळता राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू

मुंबई : राज्यातील महाविद्यालये सोमवार (दि. 15)पासून सुरू होणार आहेत, मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये सध्या सुरू होणार नाहीत. मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विचार होणार आहे. महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्‍या वसई, विरार, पालघर, पनवेल या क्षेत्रात स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर राज्य शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करीत महाविद्यालये सोमवारी सुरू होणार आहेत, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालये सुरू करण्याबाबत कळवले नसल्याची माहिती आहे.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply