Breaking News

खारघर येथे उद्या सिडको मास्टर्स कप गोल्फ स्पर्धा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
नवी मुंबईतील सिडकोच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्स या गोल्फ मैदानावर 20 फेब्रुवारी रोजी सिडको मास्टर्स कप-2021 या गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध टेनिसपटू लिअ‍ॅण्डर पेस यांसह मुंबई आणि पुण्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब (बीपीसीजी), विलिंग्डन गोल्फ क्लब, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट, पुना गोल्फ क्लब, युएस क्लब आणि गोल्डन स्वान या गोल्फ क्लबमधील गोल्फपटू या सामन्यामध्ये सहभागी होणार आहेत. या वेळी सध्याच्या गोल्फ कोर्सचा 18 होल्सच्या गोल्फ कोर्समध्ये विस्तार आणि आधुनिक सुविधांसह कण्ट्री क्लब विकसित करण्याच्या आराखड्यांचे अनावरणही करण्यात येणार आहे. या सामन्याचे आणि अनावरण समारंभाचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या समाजमाध्यमांवर करण्यात येणार आहे.
भविष्यात या नऊ होल्सचे गोल्फ कोर्स 18 होल्सचे करण्यात येणार असून, क्लब हाऊससह पूर नियंत्रणासाठी डिटेन्शन पॉण्ड, निवासी वापरासाठी अलिशान व्हीला, पंचतारांकित उपहारगृह, निवासी वापरासाठी अपार्टमेण्ट/बंगले या सुविधाही विकसित करण्यात येणार आहेत.

पहिल्या सिडको मास्टर्स कप 2021 स्पर्धेचा प्रारंभ होतोय, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. नजीकच्या काळात खारघर व परिसरात साकार होत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे खारघर भविष्यातील संधींनी अत्याधुनिक नोड बनणार आहे. त्याचबरोबर खारघर नोड हे भविष्यातील स्पोर्ट्स हब बनण्याच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. सध्याचे गोल्फ कोर्स 18 होल्सचे करण्यात आल्यानंतर व्यावसायिक सामन्यांचे आयोजन करणे शक्य होणार असून, त्याद्वारे आंतरराष्ट्रीय पर्यटनासही चालना मिळणार आहे.
-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply