Breaking News

खोपोली सायमाळ गावाजवळ अपघात

एक गंभीर, तर पाच जण किरकोळ जखमी

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावरील सायमाळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. 5) दुपारी दूधाच्या टँकरने क्रेटा कार आणि दुचाकीस्वारला धडक दिली. या अपघातात एक प्रवासी गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले.

दुधाचा टँकर मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या दरम्यान सायमाळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले व टँकरने क्रेटा कार आणि दुचाकीस्वारला धडक दिली. या अपघातातक्रेटा कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी आणि दोन जण किरकोळ तर टँकरमधील दोन जण आणि एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. यांना त्वरित खोपोली आणि कमोठे येथील रुग्णालय नेण्यात आले. जखमींची नावे समजली नाहीत.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply