Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर टँकरला आग

खोपोली : प्रतिनिधी

द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ मुंबईहून पुण्याकडे केमिकल वाहून नेणार्‍या टँकरला शुक्रवारी (दि. 5) आग लागली. वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे धावत्या टँकरला अचानक आग लागल्याचे वाहनचालकाच्या लक्षात येताच त्याने टँकर महामार्गाच्या बाजूस थांबवला.

डेल्टा फोर्स कर्मचारी राऊंडला जात असताना टँकरला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत आपल्याकडे असलेल्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि कंट्रोल रूमला कळवले. देवदूत, अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply