Breaking News

उरण नगरपरिषदेतर्फे विकास कामांचा शुभारंभ

उरण : वार्ताहर

उरण नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध वॉर्डात विकासाच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी (दि. 5) शहरातील देऊळवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन व पारचे सुशोभीकरण, बोरी येथील नगरपरिषदचे स्व. दत्ता रहाळकर मैदानाच्या बाजूला असलेल्या नामदेव मंदिर रस्त्याचे व साई नगर येथील रस्त्याचे आदी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सायली भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मुख्याधिकारी संतोष माळी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह,  नगरसेवक राजेश ठाकूर, धनंजय कडवे, मेराज शेख, नगरसेविका दमयंती म्हात्रे, जानव्ही पंडीत, रजनी कोळी, शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, जसिम गॅस, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर  तसेच रोहित पाटील, विनोद रूपचंदानी, बोरी व देऊळवाडी  ग्रामस्त आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply