Breaking News

पोलादपूर नगरपंचायत निवडणूक लांबणीवर

पोलादपूर : प्रतिनिधी

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसून आल्याने इच्छुकांची बाशिंगं गुडघ्यावरून खाली उतरली आहेत.

पोलादपूर नगरपंचायतीच्या पहिल्या बॉडीचा कार्यकाळ संपल्याने तेथे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाची मुदत संपुष्टात येऊन पुढील प्रशासकीय कार्यकाळ सुरू झाला आहे. दरम्यान, दुसर्‍या पंचवार्षिक  निवडणुकीसाठी  मतदारांची अंतिम यादी निश्चित करण्यासंदर्भात महाड उपविभागीय अधिकारी तथा नगरपंचायतीच्या प्रशासक प्रतिमा पुदलवाड यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सुमारे 300हून अधिक मतदारांचे अर्ज प्राप्त झाले. पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीची पुर्वतयारी सुरू असतानाच आता कोविडच्या पार्श्वभूमीवर ही सार्वत्रिक निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply