Breaking News

आशिष रजकचा विश्वविक्रम; एका मिनिटात मारले 434 स्ट्रेट पंच

मुंबई ः प्रतिनिधी

मुंबईच्या कांदिवलीतील चाळीत राहणार्‍या बॉक्सर तरुणाने अवघ्या काही महिन्यांच्या सरावानंतर एका मिनिटात 434 स्ट्रेट पंच मारून विश्वविक्रम केला आहे. आशिष रजक असे या तरुणाचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील आशिष सध्या कांदिवलीतील शिवनेरी चाळीत आई-वडिलांसोबत राहतो. घरात खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आशिषने हे यश मिळवले आहे. 18 वर्षांखालील गटाचा विचार करता याआधी एका मिनिटात 334 स्ट्रेट पंच मारण्याच्या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद होती, पण आशिषने एका मिनिटात तब्बल 434 स्ट्रेट पंच मारत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आशिषच्या या विक्रमी कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया या संस्थेने घेतली असून, या संस्थेचे सिनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांनी आशिषला प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविले.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply