Breaking News

भारतीय युवा नेमबाजांचा विश्वचषक स्पर्धेत दबदबा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारताच्या युवा ब्रिगेडने येथील डॉ. कर्णीसिंग शुटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शानदार कामगिरीच्या बळावर 10 मीटर एअर पिस्तूल व 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदके जिंकली. सौरभ चौधरी-मनू भाकर यांनी एअर पिस्तूलचे आणि इलावेनिल वलारिवान-दिव्यांश पनवर यांनी एअर रायफलचे सुवर्ण जिंकले. भारत पाच सुवर्णपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. सौरभ-मनू  यांनी इराणच्या गोलनोश सेबहातोलाही- जावेद फोरोगी यांना 16-12 असे नमविले. दुसर्‍या फेरीनंतर सौरभ व मनू माघारले होते. त्यांनी पुनरागमन करीत भारताला पाचवे सुवर्णपदक जिंकून दिले. दोघे पात्रता फेरीत 384 गुणांसह दुसर्‍या स्थानी होते. यशस्विनीसिंग देसवाल व अभिषेक वर्मा यांनी तुर्कस्थानच्या सेवाल इलाहदा तारहान-इस्माईल केलेस यांना 17-13 असे नमवून कांस्यपदक जिंकले. दुसरीकडे गरतोज खांगुरा, मैराज अहमद खान व अंगरवीर सिंग बाजवा यांनी भारतीय संघाला स्कीट प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच, महिलांमध्ये परिनाज धालीवाल, कार्तिक सिंग शक्तावत व  गनीमत सेखों यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply