Breaking News

जहांगीर गॅलरीमध्ये डॉ. सुप्रभा रावराणेंच्या मेटानोआ आर्टचे प्रदर्शन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची सहकुटुंब उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये डॉ. सुप्रभा रावराणे यांच्या ’मेटानोआ’ या आर्ट प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि. 31) झाले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मेटानोआच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सुप्रभा रावराणे यांचे 30 मार्च 2021 ते 5 एप्रिल 2021 पर्यंत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ’मेटानोआ’ प्रदर्शन सुरू आहे. व्यवसायाने बायोटेक इंजिनियर असलेल्या डॉ. सुप्रभा रावराणे यांनी यापूर्वी बाली, इंडोनेशिया, थायलंड, दुबई याशिवाय भारतात चेन्नई व तिरुपती येथे निरनिराळ्या आर्ट शो मध्ये सहभाग घेतला आहे. मुंबईतील काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये उद्घाटन समारंभाला पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.

Check Also

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …

Leave a Reply