Breaking News

कळंबोलीत शॉर्ट सर्किट

विद्युत उपकरणे जळून लाखोंचे नुकसान

कळंबोली : बातमीदार

कळंबोलीतील अ, ब, क आणि ड आवार, एलआयजी 2, सेक्टर 1 मधील बैठ्या घरांमधील विद्युत प्रवाह शनिवारी (दि. 17) दुपारी अचानकपणे वाढल्याने शेकडो घरातील विद्युत उपकरणे अचानक लाईटचा स्पोर्ट झाला. या वेळी येथील नागरिकांच्या घरातील फ्रिज, टीव्ही, आणि इतर उपकरणे जळाली.

कोरोना काळात नागरिकांना वेगळ्याच आर्थिक संकटाला व समस्येला सामोरे जावे लागले आहे. विद्युत प्रवाह इतका प्रचंड दाबाने होता की टीव्ही, फ्रीज, पंखे, मोबाइल, मोबाइल चार्जर, संगणक, केबल बॉक्स व अन्य विद्युत उपकरणे पूर्णतः निकामी झाल्याने मोठे आर्थिक नुकसान येथील रहिवाशांना सहन करावे लागल आहे.

याबाबत कळंबोलीचे विद्युत अभियंता गोकुळ सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जमिनी खाली असणारी मोठी विद्युत लाईन शॉर्टसर्किटमध्ये पाणी शिरल्याने हा अपघात होऊन विद्युत उपकरणांची हानी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 1 मधील एलआयजी म्हणजे बैठ्या घरांच्या वसाहत आहेत. या वसाहतीमध्ये चार विभाग आहेत. या विभागांमधून विद्युतपुरवठा करणारी वीज वितरण कंपनीची अकरा केवीची मोठी विद्युत वाहिनी आहे. या भागात प्रत्येक विभागात 96 घरांची वस्ती आहे. दुपारी साडेतीन वाजता जमिनीखाली असणार्‍या या मोठ्या विद्युत वाहिनीमध्ये निचरा होणारे पाणी शिरल्याने मोठा स्फोट झाला.

विद्युत प्रवाह इतक्या प्रचंड वेगाने होता की, घरातील विद्युत वाहिन्यांमधून विजेचा प्रवाह मोठा वाढल्याने घरातील विद्युत साधनांचा स्फोट झाला. सि-2, सेक्टर 1, एलआयजी 2 च्या घरातील टेबलावर असलेला टीव्हीखाली पडला. या वेळी अनेक तास वीज पुरवठाही खंडित झाला होता. या वसाहतीमध्ये बहुतांशी माथाडी वर्ग वास्तव्यास असून अगदी कमी पगारामध्ये आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यात तांत्रिक चुकीमुळे निर्माण झालेल्या अपघाताने विद्युत उपकरणे निकामी झाल्याने मोठ्या आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.

अचानकपणे निर्माण झालेल्या या आर्थिक संकटाला येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत असल्याने वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने रहिवाशांचे झालेले नुकसान शासनाने पंचनामा करून आर्थिक नुकसान भरून देण्याची मागणी येथील रहिवाशांनी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबतचा पत्रव्यवहार ते विद्युत वितरण कंपनी व तहसीलदार यांच्याकडे करणार आहेत.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply