Breaking News

यंदाची आयपीएल विक्रमांसाठी खूणावतेय!; कोहली, डिव्हिलियर्स, गेल, धवन वॉर्नर सज्ज

मुंबई ः प्रतिनिधी

आयपीएल 2021ची सुरुवात 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. यात यंदाही नवे विक्रम होण्याची शक्यता आहे. ज्या काही खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची संधी आहे त्यामध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश आहे. त्यांच्या कामगिरीकडे अधिक लक्ष असेल.

विराट कोहली : आयपीएलच्या इतिहासात सर्वांधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. त्याने आतापर्यंत पाच हजार 878 धावा केल्या आहेत. या आयपीएलमध्ये विराटला सहा हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. यासाठी विराटला फक्त 122 धावांची गरज आहे. असे करताच तो आयपीएलमध्ये सहा हजार धावा करणारा पहिला खेळाडू होईल.

एबी डिव्हिलियर्स : आयपीएल 2021मध्ये एबी डिव्हिलियर्सला खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत चार हजार 849 धावा केल्या आहेत. या वर्षी 151 धावा केल्यास तो पाच हजार धावांचा टप्पा गाठेल. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावा करणारा तो सहावा फलंदाज ठरेल.

ख्रिस गेल : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आयपीएल 2021मध्ये एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या वर्षी गेलने एक षटकार मारल्यास आयपीएलमध्ये त्याचे 350 षटकार पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरले. गेलने 132 सामन्यांत चार हजार 772 धावा केल्या आहेत. यात 349 षटकारांचा समावेश आहे.

शिखर धवन : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 591 चौकार मारले आहेत. आणखी नऊ चौकार मारल्यास त्याचे 600 चौकार पूर्ण होतील. स्पर्धेत 600 चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरेल. धवनने आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा पार केलेला आहे.

डेव्हिड वॉर्नर : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 48 अर्धशतके केली आहेत. या वर्षी दोन अर्धशतके करताच तो स्पर्धेच्या इतिहासात 50 अर्धशतके करणारा पहिला फलंदाज ठरेल. यासाठी तो उत्सुक असेल.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply