Breaking News

रायगडात बंद, निदर्शने आणि श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील पाली आणि नेरळमध्ये रविवारी (दि. 17) बंद पाळण्यात आला. या वेळी या हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्याचे सलग तिसर्‍या दिवशी रायगड जिल्ह्यात पडसाद उमटले. सुधागड तालुक्यातील पाली व परळी येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून हल्ल्याचा निषेध केला. या वेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील नेरळ येथे रिक्षा चालक मालक संघटनांनी श्रद्धांजली अर्पण केली व रिक्षा बंद ठेवून दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला. परिसरातील व्यापार्‍यांनीही बंद पाळला.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply