Breaking News

माणगाव, इंदापुरात विनामास्क, अनावश्यक फिरणार्‍यांवर कारवाई

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातही दरदिवशी सरासरी 35 कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष घातले असून, तालुक्यातील माणगाव आणि इंदापूर बाजारपेठेत सोमवारी (दि. 19) विनामास्क व गरज नसताना फिरणार्‍या 126 इसमांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 26 हजार 100 रुपये  दंड वसूल करण्यात आला आहे. माणगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांतून कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळत आहेत. या महामारीला रोखण्यासाठी नागरिकांनी निर्बंध, नियम, अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेक नागरिक बाजारात बिनधास्तपणे फिरत आहेत. माणगाव तसेच इंदापूर येथील बाजारपेठेत सोमवारी विनामास्क फिरणार्‍या 48 इसमांवर कारवाई करून त्यांच्याकडून 10 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर गरज नसताना वाहनावरून   फिरणार्‍या 78 इसमांच्याकडून 15 हजार 600 रुपये असा एकूण 126 इसमांकडून एकूण 26 हजार 100 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. पोलीस तसेच माणगाव नगरपंचायत आणि इंदापूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply