Breaking News

कर्जतमध्ये 18 ते 45 वयोगटासाठीही लसीकरण

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

शहरात तीन तीन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी पहिले लसीकरण केंद्र गुरुवारी (दि. 6) सुरू करण्यात आले. आज पहिलाच दिवस असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी केली होती. या केंद्रावर 18 ते 45 वयोगटासाठीही लसीकरण करण्यात आले. कर्जत उप जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील नागरिकांना लस घेण्यासाठी ग्रामीण भागात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर जावे लागत होते. त्यात वेळ व पैसा खर्च होत होता. शिवाय त्या केंद्रांवर लस उपलब्ध नसली तर, हेलपाटाही होत असे. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा परिषद व नगर परिषदेने कर्जत शहरात तीन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर शाळेतील पहिले लसीकरण केंद्र गुरूवारी सुरू केले. पहाटे पाच वाजल्यापासून लसीकरणासाठी नागरिक उपस्थित होते. मात्र प्रत्यक्ष लसीकरण अकरा वाजता सुरू झाले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. पी. मोरे, गट विकास अधिकारी बालाजी पुरी,  मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील हे आपल्या कर्मचार्‍यांसह नियोजन करीत होते. जि. प.च्या आरोग्य विभागातील डॉक्टर व नर्स लसीकरणाचे काम करीत होते. पहिली लस सुनील जोशी यांना देण्यात आली. या केंद्रात रोज 80 जणांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. उद्या दहिवली विभागासाठी दत्तात्रेय डोंबे विद्या निकेतन व भिसेगाव- गुंडगे विभागासाठी भिसेगाव येथील जय आंबे माध्यमिक विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply