Breaking News

बनावट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देणारा अटकेत

पनवेल : वार्ताहर

कुठल्याही प्रकारचे स्वॅब न घेता दोन हजार रुपयांमध्ये कोविड-19 आरटीपीसीआर टेस्टचे निगेटीव्ह रिपोर्ट तयार करुन देणार्‍या दुक्कली पैकी एकाला गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलच्या पथकाने कळंबोलीतून सापळा लाऊन अटक केली आहे. गुन्हे शाखेने आता आरटीपीसीआरचे रिपोर्ट तयार करून देणार्‍या लॅब टॅक्निशीयनचा शोध सुरू केला आहे. नोकरदार वर्गाला तसेच प्रवासासाठी आणि इन्शुरन्स क्लेमसाठी लागणारे ‘कोविड-19’चे आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट स्वॅब न घेता, कळंबोलीत राहणारा संजय ईश्वर भंडारी (वय 35) 2000 रुपयांमध्ये तयार करून ते व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देत असल्याची माहिती उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने दोन बोगस नावाने आधारकार्ड तयार करुन ते बोगस ग्राहकाच्या माध्यमातून संजय भंडारी याच्या मोबाइलवर पाठवून दिले, तसेच त्या नावाने आरटीपीसीआरचे निगेटीव्ह रिपोर्ट तयार करून देण्यास सांगितले. या वेळी भंडारी याने दुसर्‍या दिवशी दुपारी दोन्ही व्यक्तींचे रिपोर्ट मिळतील, असे बोगस ग्राहकाला कळविले होते. त्यानुसार भंडारी याने दोन्ही व्यक्तींच्या नावाचे आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट बोगस ग्राहकाला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवून दिले. यानंतर या रिपोर्टच चार हजार रुपये घेण्यासाठी कळंबोलीतील केएलई कॉलेज जवळ आलेल्या भंडारी याला वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक निरीक्षक गणेश कराड, प्रविण फडतरे, उपनिरीक्षक वैभव रोंगे आणि त्यांच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, हेरिपोर्ट त्याला संकेत कोरडे या लॅब टेक्निशीयनने दिल्याचे सांगितले. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी संजय भंडारी याच्यावर गुन्हा दाखल करून लॅब टेक्निशीयन संकेत कोरडे याचा शोध सुरू केला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply