Breaking News

जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या पूर्वतयारीचा आढावा 

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपतर्फे तालुका आणि महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या वस्तूंच्या वाटपाची पूर्वतयारी मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात, तसेच सीकेटी स्कूल येथे सुरू आहे. या पूर्वतयारीचा भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत तसेच जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, मंडळाचे कार्यालयीन सचिव अनिल कोळी आदींनी शुक्रवारी आढावा घेतला.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply