Breaking News

गौरव कांडपिळेंचा राष्ट्रपतींकडून सन्मान

आमदार प्रशांत ठाकूरांकडून अभिनंदन

पनवेल ः बातमीदार
कोरोना काळातील सेवाभावी कामाची दखल घेऊन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भाजप युवा मोर्चा पनवेलचे सरचिटणीस गौरव अजय कांडपिळे यांचा गौरव केला आहे. कोरोना काळातील कठीण परिस्थितीतही स्वत:ला झोकून देऊन लोकांची सेवा करणार्‍या गौरव कांडपिळे यांच्या कार्याची राष्ट्रपती भवनाने दखल घेतली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही याबद्दल गौरव कांडपिळे यांचे अभिनंदन केले आहे.
कोरोना काळातील केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल राष्ट्रपतींनी गौरव कांडपिळे यांना पत्र पाठवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. राष्ट्रपतींनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आपला सन्मान करताना आम्हालाही बहुमान मिळत आहे.
कोरोना महामारीच्या काळात आपली निष्ठा, संस्कार आणि प्रेमाने केलेल्या कामामुळे आपण आमचे मन जिंकले आहे. आपण भारत गौरवासाठी पात्र आहात.
तंदुरुस्त व्यक्तींना कोरोनापासून दूर राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, कोरोनाग्रस्तांना वैद्यकीय साह्य करणे, अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करणे, रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, आर्थिक मदत करणे, जेवणाची व्यवस्था करणे यासाठी वेळकाळाची पर्वा न करता सातत्याने मदत करण्याचे काम गौरव कांडपिळे आजही करीत आहेत. राष्ट्रपतींनी पाठविलेल्या पत्रामुळे पनवेलमधील सर्वसामान्य जनता तसेच भाजप कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply