दुबई ः वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनू साहनी यांना तातडीने पदावरून काढून टाकले आहे. साहनी यांच्यावर सहकार्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यांचा कार्यकाळ 2022मध्ये संपुष्टात येणार होता. आता त्यांच्या जागी जॉर्ज अल्लार्डिस कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील.
साहनी यांच्यावर बरेच आरोप होते. एका वर्षापासून ते आपल्या कर्मचार्यांना योग्य वागणूक देत नव्हते. अनेक कर्मचार्यांनी साहनींविरोधात तक्रार केली होती. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीला साहनी यांना रजेवर पाठवण्यात आले होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper