Breaking News

नवी मुंबई एपीएमसीत कोरोनाचा विसर

रुग्णवाढ कायम असताना नियमांचे सर्रास उल्लंघन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढत चालले आहे. नवी मुंबई महापालिकातर्फे कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकार उपायोजना केल्या जात आहे तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे, मात्र दुसरीकडे नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. 12) कोरोना नियमांचे उल्लंघन झालेले पहावयास मिळाले.

नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये व्यापारी, ग्राहक आणि हमाल न मास्क घालता फिरताना दिसत होते तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते. नवी मुंबईतील घाऊक बाजारात किरकोळ व्यापार सुरु झाला आहे. त्यामुळे बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे तसेच घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. मास्क घाला, लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेकडून केले जाते, मात्र या सूचनेला पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आले. नवी मुंबईतील बाजार आवारात जवळपास 700 गाड्यांची भाजीपाल्याची आवक झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला दिसली. नवी मुंबई महापालिकेतपर्फे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे, मात्र ते पण बाजार आवारत कारवाई करताना दिसून आले नाही.त्यामुळे अनेकजण बाजार आवारात विना मास्क किंवा अर्धवट मास्क घालून फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच जर या ठिकाणी गर्दी वाढत राहिली तर कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply