नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये 19 कामकाजाचे दिवस असणार आहेत, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्टदरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. ती मान्य करण्यात आली असून या अधिवेशनात सरकार अनेक बिले सादर करू शकते.
अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाणार असून संसदेत प्रवेश करणार्या प्रत्येकाने कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला आहे का हे तपासले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper