Breaking News

नदीचे पाणी शिरले पोल्ट्रीत

झोराबियन चिक्स कंपनीचे अतोनात नुकसान

खोपोली : प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे पूर येवून खालापूर तालुक्यात अनेकांच्या घरात, व्यवसाय ठिकाणी पाणी शिरून नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 22) पहाटे डोलवली (ता. खालापूर) येथील झोराबियन चिक्स कंपनीत नदीचे पाणी घुसून सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

झोराबियन चिक्स कंपनीत चिक्सची निर्मिती ते चिकन तयार करण्याचे उत्पादन केले जाते. गुरुवारी पहाटे डोलवली-केलवली या नदीचे पाणी पोल्ट्रीमध्ये शिरून आधुनिक तंत्रज्ञानच्या मशीन, कोंबड्यांचे खाद्य, वातानुकूलित यंत्रणा, ट्रॅक्टर, गाड्या, ट्रे, कामगारांचे सामान, कार्यालयीन साहित्य व पक्षांची मोठी हानी झाली.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply