पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषांत आणि तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 50 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. गट ‘अ’साठी (इयत्ता पहिली ते चौथी) मी वर्गाचा मॉनिटर झालो तर, शाळा कधी चालू होणार?, मी मुख्याध्यापक झालो तर, माझा आवडता विषय, गट ‘ब’साठी (इयत्ता पाचवी ते सातवी) मी पंतप्रधान झालो तर, मी देव झालो तर, घराचे प्रतिनिधित्व कुणाकडे? आई की बाबा?, माझा आवडता विषय गट ‘क’साठी (इयत्ता आठवी ते दहावी) नेतृत्व वारसा हक्काने की कर्तृत्वाने, माझा आदर्श नेता, पनवेल नगरीच्या विकासात आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे योगदान, माझा आवडता विषय असे विषय या स्पर्धेसाठी असणार आहेत. स्पर्धा प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख 2 ऑगस्ट असून संपर्क क्रमांक 7757000000 किंवा ज्ञेीहळीहर्षेीपवरींळेप.िीऽसारळश्र.लेा या ई-मेल आयडीवर प्रवेश नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सभागृह नेते व कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper