पनवेल : बातमीदार
आम्ही उद्योगिनी नवी मुंबई शाखा व नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या माध्यमातून महिलांना विनामूल्य डेनिम ज्वेलरी व अॅक्सेसरीज प्रशिक्षण देण्यात आले. शुक्रवारी (दि. 22) दुपारी 2 ते 5 वा. सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र, समाज मंदिर, सेक्टर 5 ई मध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. या वेळी हॅन्डीक्राफ्ट ज्वेलरी डिझायनर राजश्री साळुंके या महिलांना मार्गदर्शन करतील. याशिवाय डेनिमचे दागिने व अॅक्सेसरीज बनविण्याचा व्यवसाय घरच्या घरी कसा करावा, कॉर्पोरेट गिफ्टचे आकर्षक पॅकिंग व प्रेझेन्टेशन कसे कराल यासंबंधी टीप्स दिल्या जातील. नाव नोंदणीसाठी 9029014982 येथे संपर्क साधावा.