Breaking News

जेएनपीटी परिसरातील जलप्रदुषणामुळे मासेमारी धोक्यात

उरण : वार्ताहर

जेएनपीटी बंदर परिसरात असलेल्या एका रासायनिक प्रकल्पात ऑईल गळती लागली आहे. पाच दिवसांपूर्वी लागलेल्या गळतीतून एडिबल ऑईल थेट नाल्यावाटे समुद्रात पोहचत असल्याने परिसरात जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे.

जेएनपीटी परिसरात अनेक रासायनिक प्रकल्प आहेत. अशा विविध रासायनिक प्रकल्पात तीन हजारांपासून 10 हजार किलो लीटर्स क्षमतेच्या तेल साठवणूकीच्या टाक्या आहेत. या प्रचंड क्षमता असलेल्या टाक्यांमध्ये अत्यंत ज्वालाग्राही असलेला नाफ्ता, क्रूड ऑइल, एडिबियल ऑईल आदी ज्वलनशील रासायनिक पदार्थाची साठवणूक केली जाते. मागील पाच सहा दिवसांपासून जेएनपीटी परिसरातील एका रासायनिक कंपनीत एडिबल ऑईलची गळती लागली आहे. गळती लागलेले एडिबल ऑईल थेट नाल्यावाटे समुद्रात पोहचत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.

या प्रत्यक्षदर्शींकडून नाल्यावाटे वाहत जाणारे एडिबल ऑईल कामगारांमार्फत ड्रममध्ये भरून काढले जात असल्याचेही पाहाण्यात आले असल्याचे सांगितले जाते. नाल्यातुन वाहत ऑईल थेट समुद्रात मिसळत आहे. त्यामुळे जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. या जलप्रदूषणामुळे स्थानिक मासेमारीही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण  झाली आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply