Breaking News

रोडपालीतील समस्या मार्गी लावा; अन्यथा आंदोलन!; भाजपचे सिडको अभियंत्यांना निवेदन

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोलीमधील रोडपाली सेक्टर 16, 17, 20मधील विविध समस्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यासाठी व ती कामे लवकरात लवकार पूर्ण करण्यासाठी कळंबोली भाजपतर्फे सिडकोला निवेदन देण्यात आले आहे. भाजप पदाधिकार्‍यांनी येथील सिडकोच्या ऑफीसमध्ये अभियंता बनकर यांची भेट घेतली. या वेळी कामे लवकरात लवकर करावी, असे त्यांना ठणकावून सांगण्यात आले. जर ही कामे पूर्ण झाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. रोडपाली सेक्टर 16, 17, 20मधील विविध समस्या, यामध्ये खराब रस्ते, गटारावरील तुटलेल्या अवस्थेतील झाकणे, मोकळ्या भूखंडावरील साफसफाई, स्ट्रीट लाईट, सिक्युरिटी गार्ड, क्लिनर अशा विविध समस्या सिडकोकडून लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या, अशी मागणी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. सिडको अभियंत्यांच्या भेटीच्या वेळी भाजप नगरसेवक अमर पाटील, कुमार विद्यानंद झा, सागर नलावडे, विशाल पेडणेकर, अनिल मुलचंदानी, मनोज मिश्रा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply