Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त रोह्यात विविध सामाजिक उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 17) रोठ बुद्रुक (ता. रोहा)ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. तर रोहा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून फळे वाटप करण्यात आले. तसेच कोलाड येथील कुष्ठरोगी  वसाहतीला ऑक्सिमीटर भेट देण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप   युवा मोर्चा तर्फे रोहा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच कोलाडमधील सायकोटीक तज्ज्ञ डॉ. सागर बसवते याच्या मागणीनुसार तेथील रुग्णांसाठी ऑक्सिमीटर भेट देण्यात आली. तर रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने शंभर ग्रामस्थांना कोविशिल्ड लस देण्यात आली. भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, सरपंच नितीन वारंगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply