Breaking News

दिवाळीनिमित्त पनवेल परिसरात विविध कार्यक्रम उत्साहात

नवीन पनवेलमध्ये दिवाळी पहाटनिमित्त ’दिपज्योतीर्नमोस्तुते’

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेलच्या उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ आयोजित ’दिपज्योतीर्नमोस्तुते’ दिवाळी पहाट हा स्वर – झंकार प्रस्तुत मराठी-हिंदी संगीताचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 4) नवीन पनवेलमधील बांठिया स्कूलच्या हॉलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून करण्यात आला. 

भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन पनवेल प्रभाग 17 मधील नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळातर्फे दिवाळी पहाट निमित्त दिपज्योतीर्नमोस्तुते हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकुर यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशीला घरत, नगरसेविका अ‍ॅड. वृशाली वाघमारे, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजू गायकर , प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ, प्रशांत फुलपगार व मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या कार्याचे कौतुक करून उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मनोज भुजबळ यांनी या प्रभागात उद्यानांच्या कामाला महापालिकेने मंजूरी दिली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply