पाली, मुरूड ः प्रतिनिधी
सर्व जण दिवाळीचा उत्सव हर्षोल्हासात साजरा करीत असताना रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 6) सलग दुसर्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर पीक भिजल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
दीपावली पाडव्याच्या दिवशी वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी भाऊबीजेच्या दिवशीही पाऊस पडला. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले. अनेक जण पावसात भिजले. फटाके वाजवता न आल्याने बच्चेकंपनी निराश झाली, तर या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे.
सध्या शेतकर्यांनी कापणी केली असून मळणी व झोडणीची प्रक्रिया सुरू आहे, मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने धान्याचे मोठे नुकसान झाले. आता राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.
Check Also
कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा
मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper