Breaking News

शोएब मलिकचे अभिनेत्रीसोबत फोटोशूट

लाहोर ः वृत्तसंस्था

सध्या पाकिस्तानात आणि सोशल मीडियावर आयेशा ओमर आणि शोएब मलिकच्या हॉट फोटोशूटची चर्चा सुरु आहे. आयेशा ओमर पाकिस्तानी अभिनेत्री असून पाकिस्तानातील एका स्थानिक मॅगझिनसाठी आयेशा आणि शोएबने फोटोशूट केले आहे. स्विमिंग पूलसह अन्य फोटोमधील दोघांचा लूक आणि जवळीक यामुळे या फोटोशूटची चर्चा सुरू आहे. शोएब मलिक भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती आहे. गुरुवारी दुबईत झालेल्या टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला सानिया हजर होती. पाकिस्तानी संघाला प्रोत्साहन देताना ती दिसली. तत्पूर्वी, पाकिस्तानी संघाने स्कॉटलंडवर विजय मिळवल्यानंतर आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले. आयेशा आणि शोएबने मागच्या महिन्यात हे फोटोशूट केले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply