Breaking News

विहिंपच्या कर्जतमधील शिबिरात 85 जणांचे रक्तदान

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त वतीने कर्जत येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात 85 जणांनी रक्तदान केले. गीता जयंती शौर्य दिनाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कर्जत प्रखंड यांच्या संयुक्त वतीने आणि सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कपालेश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आरोग्यभारतीचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीने रक्तसंकलनाचे काम केले. कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड अध्यक्ष  विनायक उपाध्ये, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख महेश बडेकर, सहप्रमुख दिनेश रणदिवे, केदार भडगावकर, अनंत हजारे, सचिन ठाकूर, वैभव जोशी, भरत राजगुरू, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, नगरसेवक बळवंत घुमरे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिजीत मराठे, महेंद्र कांबळे, प्रभाकर करंजकर, पुंडलिक भोईर आदी उपस्थित होते. 

Check Also

पनवेलमध्ये नारीशक्ती वंदन अधिनियम समर्थनार्थ भव्य पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी टप्पा मानल्या जाणाऱ्या नारीशक्ती वंदन अधिनियम या …

Leave a Reply