Breaking News

पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास

उरण : प्रतिनिधी

प्लास्टिकच्या जास्त वापरामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरण्यात बंदी करावी या मुख्य विषयावर जनजागृती करण्याकरिता उरण ते गोवा असा 650 किलोमीटरचा सायकल प्रवास उरण येथील विवेक घरत आणि रोहा येथील सूरज खांडेकर या दोन तरुणांनी केला आहे. प्रदूषण ही समस्या मोठी गंभीर बनली आहे. हवेतील प्रदूषण समुद्रातील प्रदूषण प्लास्टिक मुले समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ लागले आहे. समुद्रातील विविध जीवांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. अनेक प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या प्लास्टिक बंदीच्या जनजागृती करण्यासाठी विवेक भगत आणि सूरज खांडेकर यांनी 650 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. या सायकल प्रवासातून केलेल्या जनजागृतीमुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply