पनवेल ः रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कौशल्यात आणखी भर पडावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 10 ते 13 डिसेंबरदरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे चेअरमन आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) झाले.
या वेळी रायगड बॅडमिंटन संस्थेचे सचिव डेव्हिड अल्वारीस, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सहाय्यक व्यवस्थापक श्यामनाथ पुंडे, व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र भगत, शिवा कराली, योगेश पाटील यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
Check Also
रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …
RamPrahar – The Panvel Daily Paper