Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो उलटला

चालकाचा मृत्यू; एक जखमी

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर मालवाहू पीकप टेम्पोने धडक दिल्याने टेम्पो उलटून गंभीर अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालक सचिन शिंदे (पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सागर चव्हाण (पुणे) हा जखमी झाला आहे.

जखमीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पहाटे तीनच्या दरम्यान घडला. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी आयआरबी यंत्रणा, देवदूत, डेल्टा फोर्स, हायवे व खोपोली पोलीस, आरोग्य यंत्रणा, सेव लाइफ फाउंडेशनच कर्मचारी  यांनी घटनास्थळी पोहचून मदत कार्य केले. या घटनेबाबत खोपोली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply