खारघर : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र प्रदेश भाजप व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या व विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त खारघर भाजपतर्फे दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरची पुनर्बांधणी याची देही याची डोळा पाहण्यासाठी खारघर सेक्टर 12 मधील दुर्गा माता मंदिर येथे असंख्य भक्तगण, कीर्तनकार व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र जमले होते. या वेळी कीर्तनकार, वारकरी संप्रदाय व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ह.भ.प. हेमंत महाराज मोरे, पंडित अरुण शास्त्री, पंडित सुनील वाजपेयी, पंडित उमेश चतुर्वेदी, ह.भ.प. दशरथ महाराज जाधव, आत्माराम पाटील, पोपट बगाटे, आप्पासाहेब घायाळ, म्हातारदेव शिरसाट, उत्तरेश्वर उंबरे, जगन्नाथ महाराज भानत, संगीता खोकले, सुनीता साबळे आदी आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे कीर्तनकार व साधूसंतांचा मानाची शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या वेळी भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, शत्रुघ्न काकडे, अॅड. नरेश ठाकूर, रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, रमेश खडकर, बिना गोगरी, सोशल मीडिया सहसंयोजक मोना अडवाणी, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, आध्यात्मिक सेल संयोजक नवलकुमार मोरे, उत्तर भारतीय सेल संयोजक विनोद ठाकूर, ज्येष्ठ नागरिक सेलचे संयोजक नवनीत मारू, बंडू शिंगरूट, गुरुनाथ म्हात्रे, अशोक पवार, सुनील गायकवाड, आदेश भोईर, आनंद कांबळे, राजू विरेकर, भरत मोरे, भाऊ घुले, सिद्धेश खडकर, विनोद दाभोलकर, प्रिया मिश्रा, आशा घाडगे, पुष्पा शिंगरूट, मीनाक्षी कसबले, रत्ना शुक्ला, छाया पांडे, वर्षा कसबले आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते.