पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष व माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या सौजन्याने धानसर गावासाठी नवीन स्टेज उभारण्यात आला असून त्याचे औचित्य साधून जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने 17 ते 19 डिसेंबरपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्या स्वखर्चातून धानसर गावासाठी उभारण्यात आलेल्या नवीन स्टेजचे, तसेच जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा नेते नंदकुमार म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष चाहुशेठ पाटील, रमेश पोरजी, नरेश पोरजी, माजी सरपंच सपना घरत, राजेश तांबोळी, गोमा वावेकर, जितेंद्र पोरजी, ज्ञानेश्वर पोरजी, तुषार पोरजी, डोनाल पोरजी, राकेश पोरजी, संयोग पोरजी, स्वप्नील पोरजी, बारक्या पोरजी, जनार्दन पोरजी, गौरव वावेकर, अनिल पोरजी, तेजस गोंधळी, निहाल ठाकूर, विश्वनाथ पोरजी, प्रतीक पोरजी, बंडू गोंधळी, तालुका चिटणीस सुरेश पोरजी, बूथ अध्यक्ष जितेंद्र पोरजी, ग्रामपंचायत सदस्य नाना पोरजी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवस चालणार्या या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास 50 हजार रुपये, द्वितीय 25 हजार, तृतीय क्रमांक पटकाविणार्या संघास 15 हजार रुपये, तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीरास विशेष पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper