मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीतर्फे अखेरच्या टप्प्यात मोहोपाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेने पनवेल, उरण तालुक्यातील राजकीय माहोलच बदलून गेला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अखेरच्या टप्प्यात जोष आणण्यात गडकरी हे यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या भाषणातून विकासाच्या मुद्यालाच सर्वोच्च प्राधान्य दिल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यात या परिसरात होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांतून हजारो रोजगार निर्माण होणार असल्याने त्यामध्ये स्थानिकांनाच प्राधान्य देण्याचे सूतोवाच नितीन गडकरी यांनी केल्याने स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. एकूणच गडकरी आले, त्यांनी पाहिले आणि जिंकलेही असेच या जाहीर सभेचे वर्णन करणे उचित ठरेल. त्या सभेची चित्रमय झलक.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper