Breaking News

भाताणकरांना नववर्षाची भेट; जलजीवन मिशन अंतर्गत आज पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’नुसार भाताण गावात 71 लाख 57 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 1) सायंकाळी 4.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. भाताण गावात होणार्‍या या योजनेचे भूमिपूजन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू होणार्‍या या योजनेमुळे भाताण आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा संकल्प लवकरच पूर्ण होणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply