Breaking News

सुधागड तहसील कार्यालयात महिलांना सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन

पाली : प्रतिनिधी

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिसांकडून महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार वैशाली काकडे, महिला पोलीस कर्मचारी मनीषा लांगी, रेखा म्हात्रे, स्वप्नाली म्हात्रे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणावर प्रत्येक विभागात भर दिला जातोय. महिला सुरक्षेसंदर्भात पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून युवती व महिलांना आवश्यक ती माहिती व जनजागृती करण्यावर भर दिला आहे.

या कार्यशाळेचा महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत असून स्वयंसुरक्षेच्या दृष्टीने महिला अधिकाधिक सजग व जागरूक होत आहेत. सुधागड तहसील कार्यालयात ही कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी महिला अत्याचारविरोधी कायदेविषयक माहितीचे मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उज्ज्वला भोईर, पुरवठा अव्वल कारकून सुमिता डाके, सरला कराळे, सौ. म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply