Breaking News

बँक सुरक्षा कर्मचारी अशोक सालकर सेवानिवृत्त

खोपोली : प्रतिनिधी

डोंबिवली सहकारी बँकेच्या खोपोली शाखेतील सुरक्षा कर्मचारी अशोक सालकर हे 30 वर्षांच्या सेवेनंतर शुक्रवारी (दि. 31) निवृत्त झाले. त्यांना खोपोली शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक प्रकाश खाडिलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. या वेळी त्यांच्या पत्नी प्रमिला सालकर व कन्या पायल सालकर उपस्थित होत्या. त्यांचाही भेटवस्तू देऊन बँकेतर्फे सन्मान करण्यात आला.

सैन्य दलात सेवा दिल्यानंतर अशोक सालकर डोंबिवली बँकेत रुजू झाले. त्यांनी सेवानिवृत्त होईपर्यंत   चांगल्या प्रकारे जनसंपर्क ठेवला, असे शाखा व्यवस्थापक  खाडिलकर यांनी या वेळी सांगितले. पत्रकार जयवंत माडपे व इतर मान्यवरांनीही या वेळी आपले विचार व्यक्त केले. स्वाती घांग्रेकर, प्रांजळ मिसाळ, विनया दातार, प्रणव निकम, सुभाष पाटील, शंकर कोठरे यांच्यासह अनेक बँक ग्राहक या वेळी उपस्थित होते.

Check Also

न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …

Leave a Reply